मान्यवर व मार्गदर्शक

मान. जिल्हा समन्वयक श्री.वैभव साखरे, श्री . किरण बेळगे , श्रीम.नीता चौधरी मॕडम यांच्या मार्गदर्शनाने

Wednesday 29 March 2017

विशेष शिक्षकांना महत्त्वाचे ॲप

┄─┅•●●●◆◆●●●•┅─┄
🚥 *बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण *🚥
             iedurc2.blogspot.in
💐💐💐💐💐💐💐💐💐
      ╭════════════╮
       ▌     *विशेष शिक्षकांना
                महत्त्वाचे ॲप *         ▌
      ╰════════════╯
*सर्व शिक्षा अभियान - समावेशित शिक्षणात विशेष शिक्षक म्हणून काम करत असताना आपणास  विविध माहिती द्यावी लागते.तसेच अध्यापन करताना ब-याच गोष्टी कराव्या लागतात. जसे की माहिती पाठवणे, एखादी फाईल शेअर करणे, व्हिडिओ डाऊनलोड करणे.*
*मिञानों आज मी आपणास असे दहा app विषयी माहिती सांगणार जे आपणास शैक्षणिक काम करत  असताना फार उपयुक्त ठरणार आहेत.आपणाकडे स्मार्ट फोन असेल तर आपणाकडे खालील  app असावीत.*
१) *Marathi kids *
*Link:-* https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi_apps.marathi_balwadi
*उपयोग* दिव्यांग मुलांना शिकवत असताना जसे- १ली ते ४ थी
कर्णदोष विद्यार्थी चित्र व नाम.तर आपणाकडे हे app असायला हवे प्राथमिक तयारासाठी फार चांगले app आहे.
*१०)* *ABC KIDS Pro*
*link:- https://play.google.com/store/apps/details?id=com.rvappstudios.abc_kids_toddler_tracing_phonics
*उपयोग* आपणास ABCD ची तयारी घेण्यासाठी फार चांगले app आहे  दिव्यांग मुलांना (CWSN)तर हे app फार उपयुक्त आहे.एकवेळ वापरुन पाहा.
*०१)* *WPS OFFICE*
*link:-* https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng
*उपयोग* संगणकावर दिसणा-या सर्व फाईल या app मध्ये open होतात.pdf, excal,doc,ppt अशा फाईल ओपन करण्यासाठी उपयुक्त.
*०२)* *Sparsh Marathi keybord*
*link* https://play.google.com/store/apps/details?id=com.sparsh.inputmethod.marathi
*उपयोग* स्मार्ट फोनमध्ये मराठी व इंग्रजी मध्ये type करण्यासाठी फार उपयुक्त व सोपे app आहे.
*०३)* *Mx player*
*link:-* https://play.google.com/store/apps/details?id=com.mxtech.videoplayer.ad
*उपयोग* सर्व प्रकारचे HD Video मोबाईल वर Play करण्यासाठी अतिशय उपयुक्त video player आहे.
*०४)* *SHAREit*
*link:-* https://play.google.com/She tore/apps/details?id=com.lenovo.anyshare.gps
*उपयोग* वेगवेगळ्या फाईल shere करण्यासाठी व मिञांच्या मोबाईलवरुन video, pdf, image घेण्यासाठी उपयुक्त आहे. याचा file send/receive करण्याचा वेग खुप चांगला आहे.
*०५)* *Google keep*
*link:-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.keep
*उपयोग* आपणार एखादी माहिती सेव्ह करुन ठेवायाची असेल तर हे app फार उपयुक्त आहे. आवडलेला massage, कथा, हिशोब, लिहून ठेवण्यासाठी उपयोगी
*०६)* *Vid Mate*
मिञानो हे app play store वर उपलब्ध नाही खालिल link वरुन download करुन घ्या.
*link:-* http://www.vidmate.mobi/download?p=Mg&ref=wa
*उपयोग* Youtube वरिल व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी सर्वात *Best* App आहे.
*०७)* *Cam scaner*
*link:-* https://play.google.com/store/apps/details?id=com.intsig.camscanner
एखादा फोटो scan करण्यासाठी तसेच image pdf मध्ये सेव्ह करण्यासाठी व Qr code scan करण्यासाठी फार चांगले app आहे मी हेच app वापरतो.या app मध्ये *scaner* & *Qr code* दोन्ही scan करु शकतो.
*०८)* *KINE MASTER*
*Link:-*https://play.google.com/store/apps/details?id=com.nexstreaming.app.kinemasterfree
*उपयोग* या app चा वापर करुन अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक, स्वतःचे फोटो वापरुन चांगल्या दर्जाचे video बनवू शकतो. वापरुन पाहा अतिशय चांगले app आहे.

_*विविध शैक्षणिक माहितीसाठी अथवा इतर मदतीसाठी माझ्या Blog ला आवश्य भेट द्या.*_
📧 bajajurc2@gmail.com
📱 09768930798
● *iedurc2.blogspot.in* ●
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
👉👉👉 *संकलन मार्गदर्शन * 👈👈👈
         मान. जिल्हा समन्वयक ,
       बृहन्मुंबई महानगरपालिका
सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण
📼📼📼📼📼📼📼📼📼📼

═══════════════════
┄─┅•●●● *आपल्या शैक्षणिक Group वर शेअर करायला विसरु नका.*●●●•┅─┄

Wednesday 22 February 2017

👉 _*समाजकल्याणतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजना*_


👉
तळागाळातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना  शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागातर्फे राज्यातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवत असते. काय आहेत योजना ते पाहूया...

👉 _*निवारा योजना*_

या योजनेत प्रत्येक लाभार्थीस 47000 रु. अनुदान मंजुर करण्यात येते. त्यामध्ये लाभार्थ्याने 3000 स्वहिस्सा खर्च करायचा असतो. सदर स्वहिस्सा रोख रक्कम देवून अथवा श्रमदानातुन जमा करता येतो. या योजनेसाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमीहीन अथवा त्याचे नावे घर असेल तर ते कुदामोडीचे असणे आवश्यक आहे.

👉 _*शिष्यवृत्ती योजना*_

या योजने अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही. प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमाणे प्रथम दोन विद्यार्थ्यांना व कमीत कमी 50% गुण असणाऱ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेमधुन अनुसूचित जातीच्या इ. 5 वी ते 10 वी मध्ये असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना रु. 1000/- प्रमाणे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील इ. 5 वी ते इ. 7 वीच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते                                               
                                                                👉 _*दलित वस्ती सुधार योजना*_

या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोई, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार इ. व्यवस्था करून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक गावास लोकसंखेच्या निकषानुसार जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.

👉 _*वृद्धाश्रम योजना*_

या योजने अंतर्गत ज्या व्यक्ती निराधार आहेत. ज्या व्यक्तींना कसल्याही प्रकारचा आधार नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत महिना 500 रु. प्रमाणे मान्य संख्येला शासनातर्फे अनुदान देण्यात येत असते.

👉 _*अपंगांसाठी योजना*_

1. _*कृत्रिम अवयव पुरविणे*_

अपंगांना त्यांचे अपंगत्व कमी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली होण्यासाठी आवश्यक तो कृत्रिम अवयव पुरवठा करण्यात येतो. यासाठी खर्चाची मर्यादा प्रती लाभार्थी रु. 3000 पर्यंत आहे.

2. _*व्यावसायिक प्रशिक्षण*_

शारीरिक दृष्ट्या अपंगाना व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.

3. _*अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार*_

विभागीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण अंध व कर्णबधीर, अस्थिव्यंग वर्गातील प्रत्येकी तीन गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रु. 1000 रोख रकमेचा पुरस्कार समारंभ पुर्वक दिला जातो.

Friday 17 February 2017

समावेशी शिक्षा

समावेशी शिक्षा

Samaveshan(shiksha)

समावेशी शिक्षा (अंग्रेज़ीInclusive education) एक शिक्षा प्रणाली है।

शिक्षा का समावेशीकरण यह बताता है कि विशेष शैक्षणिक आवश्यकताओं की पूर्ति के लिए एक सामान्य छात्र और एक दिव्यागछात्र को समान शिक्षा प्राप्ति के अवसर मिलने चाहिए। इसमें एक सामान्य छात्र एक दिव्याग छात्र के साथ विद्यालय में अधिकतर समय बिताता है। पहले समावेशी शिक्षा की परिकल्पना सिर्फ विशेष छात्रों के लिए की गई थी लेकिन आधुनिक काल में हर शिक्षक को इस सिद्धांत को विस्तृत दृष्टिकोण में अपनी कक्षा में व्यवहार में लाना चाहिए।[1]

समावेशी शिक्षा या एकीकरण के सिद्धांत की ऐतिहासक जड़ें कनाडा और अमेरिका से जुड़ीं हैं। प्राचीन शिक्षा पद्धति की जगह नई शिक्षा नीति का प्रयोग आधुनिक समय में होने लगा है। समावेशी शिक्षा विशेष विद्यालय या कक्षा को स्वीकार नहीं करता। अशक्त बच्चों को सामान्य बच्चों से अलग करना अब मान्य नहीं है। विकलांग बच्चों को भी सामान्य बच्चों की तरह ही शैक्षिक गतिविधियों में भाग लेने का अधिकार है।[2]

पूर्णत: समावेशी विद्यालय तथा सामान्य/विशेष शैक्षिक नीतियाँ

छात्रों तथा शिक्षा नीतियों का वर्गीकरण

वैकल्पिक समावेशी कार्यक्रम, विद्यालयी प्रक्रिया और सामाजिक विकास

कानूनी मुद्दे –शैक्षिक कानून और विकलांगता कानून

संसार में समावेशी शिक्षा का मूल्यांकन

समावेशी शिक्षा और आवश्यक संसाधन के सिद्धांत

समावेशी कक्षाओं की सामान्य प्रथाएँ

साधारणतः छात्र एक कक्षा में अपनी आयु के हिसाब से रखे जाते हैं चाहे उनका अकादमिक स्तर ऊँचा या नीचा ही क्यों न हो। शिक्षक सामान्य और विकलांग सभी बच्चों से एक जैसा बर्ताव करते हैं। अशक्त बच्चों की मित्रता अक्सर सामान्य बच्चों के साथ करवाई जाती है ताकि ऐसे ही समूह समुदाय बनता है। यह दिखाया जाता है कि एक समूह दूसरे समूह से श्रेष्ठ नहीं है। ऐसे बर्ताव से सहयोग की भावना बढती है।

शिक्षक कक्षा में सहयोग की भावना बढ़ाने के लिए कुछ तरीको का उपयोग करते हैं[3]:

समुदाय भावना को बढ़ाने के लिए खेलों का आयोजनविद्यार्थियों को समस्या के समाधान में शामिल करनाकिताबों और गीतों का आदान-प्रदानसम्बंधित विचारों का कक्षा में आदान-प्रदानछात्रों में समुदाय की भावना बढ़ाने के लिए कार्यक्रम तैयार करनाछात्रों को शिक्षक की भूमिका निभाने का अवसर देनाविभिन्न क्रियाकलापों के लिए छात्रों का दल बनानाप्रिय वातावरण का निर्माण करनाबच्चों के लिए लक्ष्य-निर्धारणअभिभावकों का सहयोग लेनाविशेष प्रशिक्षित शिक्षकों की सेवा लेना

दल शिक्षण पद्धति द्वारा सामान्यतः व्यवहार में आने वाली समावेशी प्रथाएँ

एक शिक्षा, एक सहयोग—इस मॉडल में एक शिक्षक शिक्षा देता है और दूसरा प्रशिक्षित शिक्षक विशेष छात्र की आवश्यकताओं को और कक्षा को सुव्यवस्थित रखने में सहयोग करता है।

एक शिक्षा एक निरीक्षण – एक शिक्षा देता है दूसरा छात्रों का निरीक्षण करता है।स्थिर और घूर्णन शिक्षा — इसमें कक्षा को अनेक भागों में बाँटा जाता है। मुख्य शिक्षक शिक्षण कार्य करता है दूसरा विशेष शिक्षक दूसरे दलों पर इसी की जाँच करता है।समान्तर शिक्षा – इसमें आधी कक्षा को मुख्य शिक्षक तथा आधी को विशिष्ट शिक्षा प्राप्त शिक्षक शिक्षा देता है। दोनों समूहों को एक जैसा पाठ पढ़ाया जाता है।वैकल्पिक शिक्षा – मुख्य शिक्षक अधिक छात्रों को पाठ पढ़ाता है जबकि विशिष्ट शिक्षक छोटे समूह को दूसरा पाठ पढ़ाता है।समूह शिक्षा – यह पारंपरिक शिक्षा पद्धति है। दोनों शिक्षक योजना बनाकर शिक्षा देते हैं। यह काफ़ी सफल शिक्षण पद्धति है।[4]

बच्चे जिन्हें अत्यधिक सहायता की आवश्यकता है

अन्य व्यवसायों के साथ सहयोग

विद्यालयों में समावेशी कार्यक्रमों के लिए छात्रों का चुनाव

आस-पास के विद्यालयों में पूर्ण समावेशी शिक्षा पर विभिन्न विचार

विस्तृत दृष्टिकोण

Monday 13 February 2017

अपंग समावेशीत शिक्षण

अपंग समावेशीत शिक्षण


अपंग व्यक्तींना मिळणारे लाभ व सवलती – अपंग समावेशित शिक्षण योजना


या योजनेत सामील होणा-या आठ मुलांच्या एका गटातील प्रत्येक बालकासाठी (वय वर्षे १८ पर्यंत) खालालप्रमाणे लाभ व सवलती मिळतात.
१.  पुस्तके व लेखन साहित्य खरोदीसाठी प्रत्येक बालकास रु. ४०० पर्यंत झालेला प्रत्यक्ष खर्च प्रतिवर्षी मिळते.
२.  गणवेशासाठी प्रत्येक बालकास रु. २०० पर्यंत झालेला प्रत्यक्ष खर्च प्रतिवर्षी मिळतो.
३.  वसतिगृहात किंवा शालेय परिसरात वास्तव्य न करणा-या प्रत्येक बालकास दरमहा ५० रु. परिवहन भत्ता मिळतो.
४.  वसतिगृहात वास्तव्य करणा-या प्रत्येक बालकास दरमहा २०० रु. प्रमाणे (प्रतिवर्षी १० महिने) निवास व भोजन खर्च मिळतो.
५.  दृष्टीहीन बालकांना इयत्ता ५ वी नंतर प्रतिमहा ५० रु. दराने वाचक भत्ता (फक्त १० महिने) मिळतो.
६.  शरीराच्या सर्वांत खालच्या अवयवात तीव्र विकलांगता असणा-या भिन्न भिन्न विकलांग बालकांना दरमहा ७५ रु. दराने मदतनीस भत्ता दिला जातो.
७.  प्रत्येक विकलांग बालकासाठी पाच वर्षांतून एकवेळ आवश्यक सहाय्यभूत उपकरणांच्या खरेदीकरिता रु. २००० पर्यंत आलेला प्रत्यक्ष खर्च उपलब्ध होतो.
८.  अस्थिव्यंग वगळता अन्य विकलांग बालकांच्या ८ जणांच्या अपंग एकात्म शिक्षण युनिटसाठी त्या-त्या विकलांगतेच्या बाबतीत विशेष शिक्षक नियुक्ती व त्याच्या वेतन आणि भत्त्यावरील प्रत्यक्ष खर्च उपलब्ध होतो.
९.  संसाधन खोलीतील साहित्यासाठी एक वेळ रु. ३०,००० अनुदान देण्यात येते.
१०.  संसाधन खोलीच्या बांधकामासाठी एक वेळ रु. ५०,००० अनुदान देण्यात येते.
टिप – वरील दर १९९२ च्या योजनेत निर्धारित करण्यात आलेले असून वाढीव दराचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे.

अपंगाचे शिक्षण व पुनर्वसन योजना


१.  अपंग विद्यार्थ्यांची शासकीय विशेष शाळा / कार्यशाळांमधून विनामूल्य शिक्षण-प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते.
२.  स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अपंगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांची विनामूल्य शिक्षण-प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. अशा अनुदानित व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळा / कार्यशाळांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते.
३.  अपंग व्यक्तींना लघुउद्योग सुरु करण्यासाठी बीज भांडवल योजनेखाली रु. १,५०,०००/- पर्यंतच्या व्यवसायासाठी बॅंकेमार्फत ८०% कर्जसाहाय्य व या विभागातर्फे २०% अथवा कमाल रु. ३०,०००/- सबसिडी देण्यात येते.
४.  इयत्ता १ ली (कर्णबधिरांना पायरीपासून) ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी, शालांतपूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या या योजनेखाली शिष्यवृत्ती देण्यात येते.
५.  इयत्ता १० वी नंतरचे उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, व्यावसायिक, तांत्रिक, वैद्यकिय व पदव्युत्तर शिक्षणासाठी, शालांत परिक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्यांना शिष्यवृत्ती या योजनेखाली शिष्यवृत्ती, वसतिगृह भत्ता, अंध विद्यारमथ्यांना वाचक भत्ता, शैक्षणिक शुल्क, अभ्यासदौरा, प्रकल्प टंकलेखन खर्च देण्यात येतो.
६.  विभागीय परीक्षामंडळामधून उत्तीर्ण होणा-या इयत्ता १० वी व १२ वी तील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाच्या अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो.
७.  अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने गरजेनुसार पुरविण्यात येतात.
८.  महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, गृहनिर्माण भवन (म्हाडा) खोली नं. ७४, तळमजला, बांद्रा, मुंबई यांचे मार्फत व्यवसायासाठी कर्जसाहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
९.  एस.एस.सी. नंतरचे शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्यांना टेपरेकॉर्डर व को-या ऑडिओ कॅसेटचा संच देण्यात येतो.
१०.  प्रशिक्षित अपंगांना व्यवसायासाठी लागणा-या साधनांकरिता अर्थसाहाय्य देण्यात येते.
११.  अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण विकासासाठी राज्यस्तरीय अपंगांच्या क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात येतात.
१२.  अपंगासाठी असलेल्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तींना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्यात येते.
१३.  गुणवंत अपंग कर्मचारी व त्यांचे नियुक्तक यांना राज्यपुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

आपले हक्क माहित आहेत का?


अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ या केंद्र शासनाच्या कायद्याने अपंग व्यक्तींना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी, पूर्ण सहभाग व हक्कांच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे.
अपंग व्यक्तींसाठी उपलब्ध करुन दिलेल्या विशेष सोई-सुविधा व त्यांच्यासाठी राखून ठावलेले हक्क केवळ खालील प्रकारचे अपंगत्व असलेल्या व विहित केलेल्या वैद्यकीय मंडळाकडून ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्रधारक अपंग व्यक्तींनाच मिळतील.
१. पूर्णतः अंध
२. अधू दृष्टी
३. कुष्ठरोगमुक्त
४. कर्णबधिर
५. शारिरीक हालचालींवर मर्यादा आणणारे अपंगत्व किंवा 
कोणत्याही प्रकारचा मेंदूचा पक्षघात झालेल्या व्यक्ती (अस्थिव्यंग)
६. मतिमंदत्व
७. मानसिक आजार

अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ हा कायदा आपली उद्दीष्टे साध्य करण्याकरीता खालील उपाययोजना करीत आहे

१. अपंगत्व येऊ नये म्हणून अपंगत्व प्रतिबंध व लवकरात लवकर निदान करण्यासाठी आरोग्य विषयक सुविधांची उपलब्धता.
२. अपंग विद्यार्थ्यांना १८ वर्षापर्यंत योग्य अशा वातावरणात मोफत शिक्षण, शिक्षण संस्थांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आरक्षण, शिष्यवृत्ती, मोफत गणवेश व प्रवासासाठी सवलत.
३. अपंग व्यक्ती काम करु शकतील अशा सुयोग्य पदांची निश्चिती व अशा पदांवर शासकीय व निमशासकीय सेवेत अपंग व्यक्तींसाठी ३ टक्के आरक्षण.
४. सार्वजनिक परिवहन पद्धती, नागरी सुविधा व सार्वजनिक इमारती / जागा वापरण्यासाठी अपंग व्यक्तींना अडथळाविरहीत अशा सुविधा.
५. अपंग व्यक्तींना उद्योग, कारखाने, स्वतःचे घर, विशेष शाळा व खास मनोरंजन केंद्र बांधण्यासाठी मदत म्हणून सवलतीमध्ये जमीन वाटप.
६. अपंग व्यक्तींचे पुनर्वसन व सामाजिक सुरक्षा.
७. अपंग व्यक्तीविषयक समस्यांवर संशोधन व मनुष्यबळ विकास.
८. अपंग व्यक्तींसाठी कार्य करणा-या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र. अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ या कायद्यानुसार अपंगत्व नसलेल्या व्यक्तीने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंगांसाठी असलेल्या विशेष सोई-सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेतल्यास व ते सिद्ध झाल्यास अशी व्यक्ती रु. २०,०००/- रकमेचा दंड अथवा २ वर्षे तुरुंगवास अथवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे.
९. अपंग व्यक्तींसाठी असलेल्या विशेष सोई-सुविधा अथवा हक्कांपासून अपंग व्यक्तींना वंचित ठेवल्यास अशी अपंग व्यक्ती आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अभिमत न्यायालयात दाद मागू शकते.
१०. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यात राज्य पातळीवर राज्य समन्वय समिती, राज्य कार्यकारी समिती, आयुक्त, अपंग कल्याण व जिल्हा पातळीवर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती ही यंत्रणा कार्यरत आहे.

कर्णबधिरत्व व त्यांचे वर्गीकरण


कर्णबधिरत्व म्हणजे काय ?
कर्णबधिरत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दुस-याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता. कर्णबधिरत्व कानातील एखाद्या भागाला इजा झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे, जन्माआधी किंवा जन्मानंतर आलेले असते. कर्णबधिरत्वामुळे ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतातच पण त्याचबरोबर बोलण्यातही दोष निर्माण होतात. भाषा विकासही खुंटतो.
श्रवणदोषाची अनुवंशिक व परिस्थितीजन्य ही दोन मुख्य कारणे आहेत.

श्रवणदोष व त्याचे वर्गीकरण


अ.क्र.                                    डेसिबल                                  श्रवणदोष

( १)                                  ० ते २५ डी. बी.                        सामान्य श्रवण (श्रवणदोष नाही)
( २)                                  २६ ते ४० डी. बी.                      सौम्य श्रवणदोष
( ३)                                  ४१ ते ५५ डी. बी.                      मध्यम श्रवणदोष
(४)                                   ५६ ते ७० डी. बी.                      मध्यम ते तीव्र श्रवणदोष
(५)                                   ७१ ते ९० डी. बी.                        तीव्र श्रवणदोष
( ६)                                    ९१ डी. बी. च्या पुढे                    अति तीव्र श्रवणदोष

कर्णबधिर प्रतिबंधक उपाययोजना


१. मुलाला कानात काडी, पेन्सील, पीन, खडू असे काही घालू देऊ नये.
२. साचलेल्या पाण्याने आंघोळ घालू नये.
३. साधे पडसे, कान दुखणे किंवा वाहणे यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरील उपचार करुन घ्यावेत.
४. कान वाहणा-या व्यक्तीचे कपडे इतरांनी वापरू नयेत, कपडे रोज उकळलेल्या पाण्याने धुवावेत.
६. जवळच्या नात्यात विवाह करु नये.
७. ध्वनी प्रदुषण असल्यास कानाला संरक्षण घ्यावे.
८. गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
९. गरोदर स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यावी. कानाला थंडी लागू देवू नये, पाण्यात भीजू नये, तसेच ताजे व सकस अन्न व उकळलेले पाणी प्यावे.
१०. मातांनी व मुलांनी रोग प्रतिबंधक लसी द्याव्यात.

कर्णबधिर मुलांच्या विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी

१. मुलाला श्रवण सहाय्यक उपकरण वापरायला उत्तेजन द्या.
२. मुलाशी त्याला आवड असेल अशा गोष्टीबद्दल बोला आणि त्याला शाब्दिक प्रतिसाद द्यायला उत्तेजन द्या.
३. पालकांनी कुटूंबातील इतरांना कर्णबधिर मुलांशी बोलायला व त्याचे हावभाव समजून द्यायला उत्तेजन द्या.
४. सारख्या वयाच्या मुलांच्या बोलण्याशी आपल्या कर्णबधिर मुलाची तुलना करु नका.
५. कर्णबधिर मुलाला सामान्य मुलासारखे वागवावे. कारण एक कर्णबधिरत्व सोडले तर इतर बाबतीत ते मूल सामान्य असते.
६. कर्णबधिर हा शाप नाही. प्रतिबंध करता येईल असा एक अपघातच आहे.
७. गावातील सामान्य मुले ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्याच शाळेत कर्णबधिर मूल शिक्षण घेऊ शकते.
८. शाळेत कर्णबधिर मुलाला पहिल्या रांगेत बसवायला सांगावे, शिक्षकांनी त्याच्यावर अधिक लक्ष द्यावे.
९. आपल्या शेजारील गावात अथवा शहरात विशेष शाळेची सोय असल्यास मुलाला विशेष शाळेत पाठवावे.
१०. शैक्षणिक शिष्यवृत्त्यांची माहिती करुन घ्यावी.
११. शक्य तितके वाकून मुलाच्या पातळीवर या मुलापासून १ मीटर अंतरावरचे बोलणे सर्वात जास्त चांगले ऐकू येते. कधी कधी मुलाच्या कानात बोलावे. डोळ्याला डोळे भिडवून प्रत्यक्ष मुलाकडे पाहून बोलावे.
१२. मुलाशी संपर्क साधतांना आजूबाजूला कमीतकमी आवाज असावा.
१३. कर्णबधिर मुलाला शक्यतो एकच, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषा शिकवावी म्हणजे उच्च शिक्षणाचा वाव अधिक मिळतो.
१४. विशेष शिक्षणाची सोय नसेल तर मुलाला नर्सरी / बालवाडी / अंगणवाडीत पाठवावे.

मतिमंद बालक जन्माला येऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने घ्यावयाची काळजी


१. नियमित डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे.
२. समतेल (पोषक) आहार घेणे.
३. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
४. पहिल्या तीन ते चार महिण्यात क्ष किरण तपासणी टाळावी.
५. धनुर्वाताची लस टोचणे अत्यंत आवश्यक आहे.
६. उंच स्टूलवर किंवा खुर्चीवर चढू नये तसेच जड सामान उचलू नये.
७. प्रसुती नंतर बाळ निळे पडले असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा व ऑक्सीजनची व्यवस्था पाहावी.
९. बाळ त्वरीत न रडल्यास डॉक्टरांची त्वरीत मदत घ्यावी.
१०. प्रसुतीनंतर बाळाचे लसीकरण करावे. (पोलिओ, गोवर, धनुर्वात)
११. बाळाला ताप आल्यास डॉक्टरांस दाखवावे.
१२. वारंवार फिट / मिरगी येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
१३. स्वच्छ उकळुन केलेले पाणी बाळाला पाजावे.

अंधत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय


१. शुष्कडोळे, खुप-या, गोवर, मेंदूची हानी, व डोळ्यांना इजा इत्यादी मुळे अंधत्व येऊ शकते. अंधत्व जन्मतःही असू शकते.
२. अंधत्वाला प्रतिबंध करण्यासाठी अ जीवनलत्व युक्त आहार घेणे आवश्यक आहे.
(  अ जीवनसत्व युक्त अन्नपदार्थ – पालेभाज्या, पिवळी व तांबडी फळे, उदा. पालक, गाजर, पपई, तसेच दूध, मांस आणि अंडी तसेच मातेने पहिली २ वर्षे मुलाला अंगावर पाजणे अत्यंत आवश्यक आहे. )
३. स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवून स्वच्छ ठेवावेत. घाण फाण्यात पोहू नये. डोळ्याचे माशांपासून रक्षण करावे.
४. खुप-या आलेल्या रुग्णावर त्वरीत इलाज करा. खुप-या संसर्गजन्य असतात आणि स्पर्श व माशांपासून पसरतात.
५. अणकुचीदार अवजारे, फटाके, टोकदार वस्तू किंवा ऍसीड मुलांपासून लांब ठेवावे.
अपंगत्वाच्या दाखल्यासाठी व इतर सोई-सुविधांसाठी संपर्काची ठिकाणे
अ. क्र.
सोई - सुविधा
संपर्काचे ठिकाण
अपंगत्वाचा दाखला, रेल्वे प्रवास सवलत व व्यंग सुधारक शस्त्रक्रिया
संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सामान्य रुग्णालये
बस प्रवास सवलत व अन्य सुविधा करिता अपंग व्यक्तींना ओळखपत्र
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये
आर्थिक उन्नतीसाठी व व्यवसाय करिता वित्तीय साहाय्य
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, गृहनिर्माण भवन (म्हाडा) खोली नं. ७४, तळमजला, बांद्रा(पूर्व), मुंबई ४०००४१
लघुउद्योगासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय साहाय्य (बीज भांडवल)
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये
व्यवसाय प्रशिक्षण
शासकीय-प्रौढ-अपंग प्रशिक्षण केंद्र- मिरज
अपंगांच्या शैक्षणिक सुविधांसाठी
उल्हासनगर, औरंगाबाद, नागपूर व अपंगांसाठी आय.टी.आय. वर्धा आणि अनुदानित अपंगांच्या कार्यशाळा
अपंगांच्या नोकरीसाठी नोंदणी
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ जिल्हा परिषद कार्यालये

अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरणे
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयातील अपंग व्यक्तींसाठींच्या विशेष सेवा योजना कक्ष
१. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विरार, बोळीज जि. ठाणे
२. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रे
३. अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्थान, हाजिअली, मुंबई
४. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी हिअरींग हॅंडीकॅप, बांद्रा, मुंबई
५. जिल्ह्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे समाज कल्याण अधिकारी, गट-अ
६. विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी मुंबई शहर / उपनगर व इतर

स्त्रोत: शिक्षक मंच

Sunday 12 February 2017

नेत्रदान म्हणजे काय ?

नेत्रदान म्हणजे काय ?

  • नेत्रदान म्हणजे काय ?
मृत्यूनंतर आपले डोळे दुसऱ्यांना बसवून दृष्टिलाभ करुन देण्यास संमती देणे म्हणजे नेत्रदान.
  • ते कसे केले जाते ?
नेत्रदात्याच्या मृत्यूची सूचना मिळताच नेत्रपेढीचे वैद्यकीय अधिकारी तेथ्‌े त्वरीत जाऊन मृताचे डोळे काढून नेतात. या कामास 15-20 मिनिटे पुरतात.
  • त्याचा फायदा काय ?
या डोळयातील पारदर्शक भाग (Cornea)  ऑपरेशन करुन 24 ते 36 तासांचे आत अंधाचे डोळयावर बसवतात. एकाचे नेत्रदानाने दोन अंधांना दृष्टिलाभ होतो.
  • नेत्रदान कोण करुन शकतो ?
कोणीही लहान-थोर, स्त्री-पुरुष, कोणत्याही जातीचे धर्माचे वर्णाचे असोत, नेत्रदान करु शकतात. मोतीबिंदू ऑपरेशन झालेले, दृष्टीदोष किंवा डोळे अधू असणारे, चष्मा वापरणारे सुद्धा नेत्रदान करु शकतात.
  • काही विपरीत परिणाम :
नाही. डोळे काढल्यावर मृत व्यक्तींचा चेहरा विद्रुप होत नाही. उलट या नाशवंत देहाचा अंश नेत्ररुपाने अंधाला डोळस बनवतो. त्याच्या अंधाऱ्या जगात प्रकाशाची ज्योत पेटवतो.
  • धर्माची आडकाठी :
अजिबात नाही. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही इतरांचे भले करा असाच सर्व धर्माचा आदेश आहे. नेत्रदान हे अत्यंत धार्मिक कृत्य आहे.
  • याचा फायदा कोणाला मिळू शकतो ?
कॉर्निया (डोळयाचा पुढील पारदर्शक भाग) याच्या विकाराने अंध असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो. अशा व्यक्तींनी यादीतील नेत्रपेढयांकडे डोळे तपासून घ्यावेत आणि नेत्रदान शस्त्रक्रियेसाठी आपले नाव नोंदवावे.
  • नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर काय करावे लागते ?
प्रथम मृताच्या डोळयाच्या पापण्या बंद करा. डोळयावर ओले कापसाचे बोळे किंवा कापडाची घडी ठेवा. खोलीतील फॅन/एसी बंद करा. यामुळे डोळे कोरडे पडणार नाहीत. नंतर वेळ न दवडता ताबडतोब नेत्रपेढीला फोन करुन नेत्रदात्याच्या मृत्यूची त्यांना सूचना द्या. त्यांना नाव, पत्ता आणि जवळची खूण सांगा. मृत्यूचा दाखला तयार ठेवा. संबंधिताच्या निधनानंतर नेत्रदान शक्यतो 4 ते 6 तासाचे आत व्हावे. पुढील व्यवस्था नेत्रपेढी तत्परतेने करील. ही सेवा अहोरात्र चालू असते.

Thursday 9 February 2017

📒 *वार्षिक अंदाजपत्रक व कार्ययोजना 2017-18* 📒


🎯 *महाराष्ट्र शासन* 🎯

🎯 *महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई*🎯

🎯 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या दृष्टीकोनातून सर्व शिक्षा अभियान समावे‍शित शिक्षण अंतर्गत* 🎯

📒 *वार्षिक अंदाजपत्रक व कार्ययोजना 2017-18* 📒

✅*महत्वाचे मुद्दे*
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
1. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थी संख्या Block/Disability/STD BGTwise

2. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी नियमित शाळेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

3. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी गृह आधारित शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

4. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी गृह आधारित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यापैकी मुख्यप्रवाहात येवून 
नियमित शाळेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

5. सन 2016-17 मध्ये नवीन शोधघेण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे  
विद्यार्थी संख्या Block/Disability/STD BGTwise

6. सन 2016-17 मध्ये नवीन शोध घेण्यात आलेल्या एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी नियमित शाळेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

7. सन 2016-17 मध्ये नवीन शोध घेण्यात आलेल्या एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी गृह आधारित शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

8. सन 2016-17 मध्ये नवीन शोध घेण्यात आलेल्या एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी गृह आधारित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून मुख्यप्रवाहात येवून 
शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या Block/Disability/STD 
BGTwise

9. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी मदतनीस सेवा पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

10. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी परिवहन सेवा पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

11. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी साहित्य साधन पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

12. सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी थेरपी सेवा पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

13.  सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी ठळक अक्षरातील पाठ्यपूस्तके पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

14.  सन 2016-17 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी ब्रेल लिपीतील पाठ्यपूस्तके पूरविण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

15.  सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले जूने व नवीन अशा एकूण 
विशेष गरजा असणारे विद्यार्थी संख्या Block/Disability/STD 
BGTwise

16. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले जूने व नवीन अशा एकूण विशेष 
गरजा असणारे विद्यार्थी पैकी नियमित शाळेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
युडाय Sep 2016. Block/Disability/STD BGTwise

17. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले जूने व नवीन अशा एकूण विशेष 
गरजा असणारे विद्यार्थी पैकी गृहआधारित शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या 
युडाय Sep 2016. Block/Disability/STD BGTwise

18. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी मदतनीस सेवा पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी 
संख्या Block/Disability/STD BGTwise

19. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी परिवहन सेवा पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

20. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी साहित्य साधने पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी 
संख्या Block/Disability/STD BGTwise

21. सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी थेरपी सेवा पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

22.  सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी ठळक अक्षरातील पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी 
संख्या Block/Disability/STD BGTwise

23.  सन 2017-18 मध्ये शिफारस करण्यात आलेले एकूण विशेष गरजा असणारे 
विद्यार्थ्यापैकी ब्रेल लिपीतील पूरविण्यासाठी शिफारस करण्यात आलेली विद्यार्थी संख्या 
Block/Disability/STD BGTwise

24. सन 2016-17 मध्ये एकूण विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यापैकी नियमित शाळेत 
शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 
प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी संख्या.

25. सन 2017-18 मध्ये एकूण विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यापैकी नियमित शाळेत 
शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांसाठी प्रस्तावित करण्यात येणा-या 
प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी संख्या.

26. सन 2016-17 मध्ये एकूण विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यापैकी 
गृहआधारित शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांसाठी व पालकांसाठी 
आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी संख्या.

27. सन 2017-18 मध्ये एकूण विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यापैकी गृहआधारित 
शिक्षण घेत असलेली विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांसाठी व पालकांसाठी प्रस्तावित 
करण्यात येणा-या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी संख्या.