मान्यवर व मार्गदर्शक

मान. जिल्हा समन्वयक श्री.वैभव साखरे, श्री . किरण बेळगे , श्रीम.नीता चौधरी मॕडम यांच्या मार्गदर्शनाने

Wednesday, 8 February 2017

मेंदूत सूक्ष्म दोष (अप्रगत मुलाच्या शिकण्यातील अडचण)

मेंदूत सूक्ष्म दोष (अप्रगत मुलाच्या शिकण्यातील अडचण)

मुल शाळेत 100% ऊपस्थित राहून सुध्दा अप्रगत का राहते.
या समस्येवर  उपाय शोधन्याचा प्रयत्न केला असता अशा मुलांच्या मेंदुत सुक्ष्म दोष असल्यामुळे त्याच्या शिकण्यात अडचणी निर्माण होतात हे लक्षात आले.

काही वर्षापुर्वी ग्रहन क्षमता कमी असलेल्या मुलांच्या समस्येला स्पर्श करणारा व ह्रदय हेलावून सोडणारा एक चित्रपट " तारे जमीन पे " आला होता.
डिसलेक्सिया (अध्ययन अक्षमता ) असलेल्या मुलांना हाताळतांना शिक्षकांनी (पालकांनी) संवेदनशिलता ठेवली तर त्यांच्या आयुष्याचा कयापालट होऊ शकतो . असा संदेशच जणू या चित्रपटातून देण्यात आला होता.

  प्रत्येक शाळेत अशा मुलांची संख्या काही प्रमाणात राहतेच. त्यातील बहूतांश मुले पाचवी ते आठवी पर्यंत शाळाबाह्य होऊन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. आपण अशा मुलांना नीट हाताळून त्यांना प्रगतीची वाट नक्कीच दाखऊ शकतो.
 मुळात learning Dificulty (अध्ययन अक्षमता ) हा आजार  डाॅक्टरी ऊपचाराने  बरा होऊ शकेल की नाही हे सांगणे अवघड असले तरी पण अशा मुलातील दोष ओळखून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न केले तर मुल निश्चीतच प्रगत होऊ शकते.

मुलाच्या ग्रहन क्षमतेतील  कमतरतेची विभागणी केल्यास त्याचे पाच ते सहा उप प्रकार पडतात.
1). डिसलेक्सिया :-
मुलांना वाचताना शब्द समजत नाहीत . ही वाचन अक्षमता , शब्दांचे आकलन करून घेण्यासाठी असलेल्या मेंदूच्या केंद्रातील सुसुत्रतेच्या अभावा मुळे होते .
  वाचण्यासाठी प्रथम शब्दातील अक्षरावर डोळ्याची नजर जायला हवी. त्यामुळे अक्षर ओळख होते . मग त्या शब्दाची प्रतिमा मेंदूत तयार होते. स्मरणशक्ति केंद्रातील प्रतीमेसी तादात्म्य पाऊन अर्थ समजतो.  मग त्या शब्दाचा उच्चार होतो.
स्मरणशक्ती केंद्रातील बिघाडामुळे जन्मतः या पेशींची पुर्णतः वाढ न झाल्याने किंवा पेशीत गुंतागुंत झाल्याने  किंवा पेशिच्या कार्याला  आवश्यक असलेल्या रासायनिक द्रव्यांच्या कमतरतेमुळे डिसलेक्सिया होतो.
2). डिसग्राफिया (लिखाणातील दोष) :-
अशी मुले आपल्या मनातील विचार तोंडाने चांगले व्यक्त करु शकतात . परंतू त्याना ते लिहीण्यास अडचणी येतात . त्यांना भाषेची समस्या येत नाही. त्यांच्या लहान स्नायूमध्ये किंवा ते नियंत्रित करणा-या मज्यातंतू मध्ये दोष असतो. त्यांचा लिहीताना वेग खूप कमी असतो. त्यांना एखादा शब्द वाक्य लिहितांना खुप वेळ लागतो . अक्षर खूप खराब येते. गिचमिड करुन लिहीले जाते .
3). व्हिज्युअल परसेप्शन (पाहीलेले वापरण्यातला दोष ):-
वाचण्यासाठी आणि लिहीण्यासाठी आपण जे पाहतो त्याचा अर्थ समजणे महत्वाचे असते . अशा मुलांत पाहीलेल्या गोष्टीचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नसते .
4). ऑडीटरी डिसक्रिमिनिशन :- भाषेचा चांगला विकास होण्यासाठी आपण जे ऐकतो ते नीट वापरता यायला हवं. अशा मुलात  मुलात शब्दांचे आवाजातील फरक ओळखण्यात अर्थपुर्ण शब्दात पुन्हा मांडण्यास दोष आढळतो .
5). डिस कॅल्कयुलिया (गणिती अक्षमता) :-

या स्थीतीत गणिती प्रक्रियामध्ये  दोष असतात. त्यांना गणिताचा अर्थ समजत नाही. त्यातील संख्या उतरवून घेताना ते चुक करतात . त्यांच्या गणिताच्या स्टेप्स चुकतात. आकडेही ऊलट सुलट लिहीतात.
6). डिसग्राफिया :-
शरिराच्या हालचाली व लिहीत असताना बोटाच्या हलचाली नियंत्रीत करण्यास मदत करणा-या  स्नायुच्या नियंत्रणास दोष असतो .
7). मेंदुतील ग्रहण क्षमता कमी असण्याची आणखी कारणे :-
मेंदुमधील काही भागात वाचन , भाषा , दृष्टी , वाच्या , यांच्याशी  निगटीत केंद्रातील पेशीत  सिरोटोनिन या द्रव्याचे प्रमाण कमी होते .    एन-अॅसिटील व अॅस्पार्टेट या द्रव्याचे प्रमाण वाढते . शिवाय मेंदुच्या  त्या केंद्राभोवती  सिराटोनिनचे प्रमाण आवष्यकते पेक्षा अधिक होते.
अशा मुलाचा आय क्यू सर्वसाधारण जरी वाटत असला तरी अभ्यासात अशी मुले अप्रगत राहतात. अध्ययन क्षमता यांच्यात नसल्याने मुले मानसिकदृष्ट्या खचतात .   अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. मग ते शाळेत खोड्या करतात ,दंगामस्ती ,खोटं बोलने असे प्रकार करु शकतात .
अशा मुलांकडे वर्ग पहिली व दुसरीतच शिक्षकांनी लक्ष द्यावे लागते . या वर्गातील मुलांना त्यांच्या शिक्षकांनी समजू घेतले नाहीतर ही मुले पुढे आपला आत्मविश्वास गमवून बसतात.
  या साठी शिक्षकांनी प्रथम त्यांना पुरेसा वेळ देवून त्यांच्यातील दोष समजून घेणे गरजेचे आहे. एकदा का त्या मुलातील  शिकण्यातील अडथळा , दोष समजला तर त्या प्रमाणे ज्ञानरचनावादी साहीत्यातून त्याला प्रगत करणे सोपे जाते.  या साठी शिक्षकांनी पण संयम बाळगायला पाहीजे . कुठेही त्याचा आत्म विश्वास खचता कामानये. दिवशेंदिवस अशा मुलातील आत्मविश्वास वाढत गेला पाहीजे . त्याच्यामध्ये असलेली इतर सुप्तगुणे शोधून त्याला संधी द्यायला पाहीजे . हळू हळू तो मुलगा त्यांच्या सर्व व्यंगावर मात करुन  आत्मविश्वास , जिद्द, शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेली शाबासकी  यांच्या जोरावर नक्कीच प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही.

Tuesday, 7 February 2017

शिक्षण हक्क कायदा RTE


RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे

शीर्षक,
कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.