मान्यवर व मार्गदर्शक

मान. जिल्हा समन्वयक श्री.वैभव साखरे, श्री . किरण बेळगे , श्रीम.नीता चौधरी मॕडम यांच्या मार्गदर्शनाने

Sunday 12 February 2017

नेत्रदान म्हणजे काय ?

नेत्रदान म्हणजे काय ?

  • नेत्रदान म्हणजे काय ?
मृत्यूनंतर आपले डोळे दुसऱ्यांना बसवून दृष्टिलाभ करुन देण्यास संमती देणे म्हणजे नेत्रदान.
  • ते कसे केले जाते ?
नेत्रदात्याच्या मृत्यूची सूचना मिळताच नेत्रपेढीचे वैद्यकीय अधिकारी तेथ्‌े त्वरीत जाऊन मृताचे डोळे काढून नेतात. या कामास 15-20 मिनिटे पुरतात.
  • त्याचा फायदा काय ?
या डोळयातील पारदर्शक भाग (Cornea)  ऑपरेशन करुन 24 ते 36 तासांचे आत अंधाचे डोळयावर बसवतात. एकाचे नेत्रदानाने दोन अंधांना दृष्टिलाभ होतो.
  • नेत्रदान कोण करुन शकतो ?
कोणीही लहान-थोर, स्त्री-पुरुष, कोणत्याही जातीचे धर्माचे वर्णाचे असोत, नेत्रदान करु शकतात. मोतीबिंदू ऑपरेशन झालेले, दृष्टीदोष किंवा डोळे अधू असणारे, चष्मा वापरणारे सुद्धा नेत्रदान करु शकतात.
  • काही विपरीत परिणाम :
नाही. डोळे काढल्यावर मृत व्यक्तींचा चेहरा विद्रुप होत नाही. उलट या नाशवंत देहाचा अंश नेत्ररुपाने अंधाला डोळस बनवतो. त्याच्या अंधाऱ्या जगात प्रकाशाची ज्योत पेटवतो.
  • धर्माची आडकाठी :
अजिबात नाही. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही इतरांचे भले करा असाच सर्व धर्माचा आदेश आहे. नेत्रदान हे अत्यंत धार्मिक कृत्य आहे.
  • याचा फायदा कोणाला मिळू शकतो ?
कॉर्निया (डोळयाचा पुढील पारदर्शक भाग) याच्या विकाराने अंध असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो. अशा व्यक्तींनी यादीतील नेत्रपेढयांकडे डोळे तपासून घ्यावेत आणि नेत्रदान शस्त्रक्रियेसाठी आपले नाव नोंदवावे.
  • नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर काय करावे लागते ?
प्रथम मृताच्या डोळयाच्या पापण्या बंद करा. डोळयावर ओले कापसाचे बोळे किंवा कापडाची घडी ठेवा. खोलीतील फॅन/एसी बंद करा. यामुळे डोळे कोरडे पडणार नाहीत. नंतर वेळ न दवडता ताबडतोब नेत्रपेढीला फोन करुन नेत्रदात्याच्या मृत्यूची त्यांना सूचना द्या. त्यांना नाव, पत्ता आणि जवळची खूण सांगा. मृत्यूचा दाखला तयार ठेवा. संबंधिताच्या निधनानंतर नेत्रदान शक्यतो 4 ते 6 तासाचे आत व्हावे. पुढील व्यवस्था नेत्रपेढी तत्परतेने करील. ही सेवा अहोरात्र चालू असते.

No comments:

Post a Comment