मान्यवर व मार्गदर्शक

मान. जिल्हा समन्वयक श्री.वैभव साखरे, श्री . किरण बेळगे , श्रीम.नीता चौधरी मॕडम यांच्या मार्गदर्शनाने

Wednesday 22 February 2017

👉 _*समाजकल्याणतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजना*_


👉
तळागाळातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना  शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागातर्फे राज्यातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवत असते. काय आहेत योजना ते पाहूया...

👉 _*निवारा योजना*_

या योजनेत प्रत्येक लाभार्थीस 47000 रु. अनुदान मंजुर करण्यात येते. त्यामध्ये लाभार्थ्याने 3000 स्वहिस्सा खर्च करायचा असतो. सदर स्वहिस्सा रोख रक्कम देवून अथवा श्रमदानातुन जमा करता येतो. या योजनेसाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमीहीन अथवा त्याचे नावे घर असेल तर ते कुदामोडीचे असणे आवश्यक आहे.

👉 _*शिष्यवृत्ती योजना*_

या योजने अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही. प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमाणे प्रथम दोन विद्यार्थ्यांना व कमीत कमी 50% गुण असणाऱ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेमधुन अनुसूचित जातीच्या इ. 5 वी ते 10 वी मध्ये असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना रु. 1000/- प्रमाणे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील इ. 5 वी ते इ. 7 वीच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते                                               
                                                                👉 _*दलित वस्ती सुधार योजना*_

या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोई, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार इ. व्यवस्था करून दलित वस्तीची स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक गावास लोकसंखेच्या निकषानुसार जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.

👉 _*वृद्धाश्रम योजना*_

या योजने अंतर्गत ज्या व्यक्ती निराधार आहेत. ज्या व्यक्तींना कसल्याही प्रकारचा आधार नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत महिना 500 रु. प्रमाणे मान्य संख्येला शासनातर्फे अनुदान देण्यात येत असते.

👉 _*अपंगांसाठी योजना*_

1. _*कृत्रिम अवयव पुरविणे*_

अपंगांना त्यांचे अपंगत्व कमी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली होण्यासाठी आवश्यक तो कृत्रिम अवयव पुरवठा करण्यात येतो. यासाठी खर्चाची मर्यादा प्रती लाभार्थी रु. 3000 पर्यंत आहे.

2. _*व्यावसायिक प्रशिक्षण*_

शारीरिक दृष्ट्या अपंगाना व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.

3. _*अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार*_

विभागीय परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण अंध व कर्णबधीर, अस्थिव्यंग वर्गातील प्रत्येकी तीन गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना रु. 1000 रोख रकमेचा पुरस्कार समारंभ पुर्वक दिला जातो.

No comments:

Post a Comment